Why Indigenous Seed


Growing and Eating Organic is the first step towards Food Sovereignty. The most sustainable agriculture would come from using Local and Indigenous seeds for these are resilient to weather changes, need less water and are full of nutrition and flavours...

My short video, speaks about the importance of asking the right questions and making an informed choice. An informed consumer is an important dimension to this whole Organic/Natural movement. Unless we create a demand for such quality foods, the farmer will not know what to grow. For he goes as per what the traders need and traders need more production and more profit.

Indigenous Seeds are a Back Bone of Sustainable Farming.

Repost From a WhatsApp Group Forward.

सह्याद्रीच्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड खोऱ्यात वसलेल्या 'धामणवन' गावाला (ता. अकोले, जि. अहमदनगर) कावेरी बचत गटाच्या महिलाएक सुंदर गीत गात होत्या. या महिलांनी लोकपंचायत संस्थेच्या मदतीने सुमारे सव्वाशेपेक्षा जास्त गावरान बियाणी जतन केली आहेत. तिथलेच एक कवी शाहीर तुळशीराम जाधव यांची ही अत्यंत सुंदर, सहजसोपी, अर्थपूर्ण, आशयघन रचना:

संकरित वाण बेचव खाणं समदाच करतंय वांदा 
म्हणून गावरान बियाणं वाचवा बरं का हो शेतकरी दादा 

हायब्रिड मालाचा पोकळ शोर
खतं औषधं लागति फार 
त्यांच्या डोसानं माती बेजार 
डोई वाढलाया कर्जाचा भार 
कर्ज फिटंना म्हणुन का घालावा गळ्यात फाशीचा फंदा
म्हणून गावरान बियाणं वाचवा बरं का हो शेतकरी दादा...

रसायन शेतीचं धोरण न्यारं
पाणी-भांडवल लागत फार 
माती माणसाचं करून शोषण 
भांडवलशाहीचं करतिया पोषण 
बाजारभावाचा नाही भरवसा 
तोट्याचा शेती धंदा आतबट्ट्याचा शेती धंदा 
म्हणून गावरान बियाणं वाचवा बरं का हो शेतकरी दादा

आपल्याच घरचा गावरान वाण 
आपल्याच मातीतली सोन्याची खाण 
सहन करतंया उन्हाची धग 
कमी पाण्यातबी धरतंया तग 

चवदार कसदार आहेच जोमदार  त्याच्याच लागावं नादा 
म्हणून गावरान बियाणं वाचवा बरं का हो शेतकरी दादा

लोकपंचायतची ललकारी 
आली शेतकऱ्यांच्या दारी 
गहू-हरभरा तूर ज्वारी 
गोळा करूया बियाणं सारी 
गावरान वाण खणखणीत नाणं पेरायचं बरका औंदा..
म्हणून गावरान बियाणं वाचवा बरं का हो शेतकरी दादा